life

नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्याआणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती.

प्रकटीकरण 22 : 1

आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते, त्या सत्याने पराभव केला.त्यांनी त्यांच्या जिवांवर अति प्रेम केले नाही. ते मरणाला भ्याले नाही,

प्रकटीकरण 12 : 11

आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वधलेल्याकोकऱ्याच्या जीनवाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, ते सर्व त्या पशूची भक्ति करतील.

प्रकटीकरण 13 : 8

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे(फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.

प्रकटीकरण 2 : 7

“जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्कराहील.

प्रकटीकरण 22 : 14

(इतर जे मेले होते, ते एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही) जे पाहिले पुनरुत्थानते हेच होय.

प्रकटीकरण 20 : 5

प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरीवस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्यादेवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,

प्रकटीकरण 3 : 5

जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही.अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यालोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.

प्रकटीकरण 21 : 27

आणि एक तृतीयांश समुद्रातील जीव मेले. आणि एक तृतीयांश जहाजे नष्ट झाली.

प्रकटीकरण 8 : 9